राज्यात रेमडीसीवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची उत्पादक कंपन्यांना सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात जाणवणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

महाराष्ट्राला रेमडीसीवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावं. रुग्णालयांमध्ये रेमडीसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमावीत, उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालयं आणि जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा करावा. काळा बाजार होऊ नये म्हणून त्याची एमआरपी कमी करावी, अशा सूचना टोपे यांनी यावेळी केल्या.

बैठकीला राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आणि वरीष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की राज्याला सध्या दररोज ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. सध्याची वाढती रुग्ण संख्या पाहता एका अंदाजानुसार एप्रिल अखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते.

कंपन्यांनी वाढीव उत्पादनाला सुरूवात केली असून त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन नविन उत्पादन यायला किमान २० दिवस लागतील. त्यानंतर राज्यात त्याचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या राज्यातील तुटवड्याची स्थिती लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आयात करण्यासाठी ठेवलेला साठा महाराष्ट्राला द्यायचं मान्य केलं आहे. मात्र पुढचे काही दिवस इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image