देशात काल १ लाख १५ हजार ७३६ नव्या कोरोना बाधित रुग्णांची झाली नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं.  दरम्यान, देशात काल नव्या १ लाख १५ हजार ७३६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर ६३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या १ कोटी २८ लाख एक हजार ७८५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ६६ हजार १७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ५९ हजार ८५६ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक कोटी १७ लाख ९२ हजार १३५ रुग्ण, कोरोनामुक्त झाले असून, सध्या आठ लाख ४३ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.