जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोरोना प्रतिबंधात्मक लशींची किंमत भारतात अधिक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खुल्या बाजारपेठेसाठीच्या, कोविड१९  प्रतिबंधात्मक लसींची किंमत अधिक असल्याचं दिसून येत असल्यानं, या किमती कमी कराव्यात असं आवाहन केंद्र सरकारनं सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केलं आहे.

या दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार देशात बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे दर राज्यांकरता, सहाशे रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी, बाराशे रुपये, तर सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीचे दर राज्यांसाठी चारशे आणि खासगी रुग्णालयांसाठी सहाशे इतके आहेत. 

दरम्यान लसींच्या भारतातल्या किमतीची तुलना इतर देशातल्या किंमतीसोबत करणं अन्याकारक होईल, अशी प्रतिक्रिया सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे. तर लस निर्मितीचा खर्च भरून निघेल एवढीच किंमत ठेवल्याचं भारत बायोटेकनं म्हटलं आहे.