मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात आज दिवसअखेर ८८३ अंकांची घसरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात आज दिवसअखेर ८८३ अंकांची घसरण झाली आणि तो ४७ हजार ९४९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २५८ अंकांची घसरण नोंदवत १४ हजार ३५९ अंकांवर बंद झाला.