देशातल्या कोरोना परिस्थितीला आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी त्याला उपस्थित होते. 

वैद्यकीय उपचारासाठी ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपलब्धता याविषयी केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी १० राज्यांच्या मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यात महाराष्ट्राखेरीज मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, तमिळनाडू, तेलंगण, कर्नाटक, आंध्र प्रदेश,उत्तर प्रदेश, आणि दिल्ली या राज्यांचे प्रतिनिधी आहेत.

ऑक्सीजनचा पुरवठा औद्योगिक वापरासाठी करण्यावर बंदी घालण्याचे आदेश काढावे असं पत्र केंद्रीय गृहसचिवांनी कालच सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलं आहे.