बृहन्मुंबई महानगर पालिकेनं सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २४ लाख ८९ हजार रुपयांचां दंड वसूल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगर पालिकेनं सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २४ लाख ८९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. पालिकेनं गेल्या ६ महिन्यात १२ हजारांहून अधिक व्यक्तिंवर कारवाई करत प्रति व्यक्ती २०० रुपये दंड आकारला आहे.

सर्वाधिक दंड कुर्ला विभागातून वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळत कोविड प्रोटोकॉलचं पालन नागरिकांनी करावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे.