देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा ओलांडला. अवघ्या ८५ दिवसात भारतानं ही कामगिरी केली असून अमेरिका आणि चीनसह जगातल्या इतर सर्व देशाना मागं टाकलं आहे.

काल ३५ लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या त्यामुळे आतापर्यंत दिलेल्या मात्राची संख्या सुमारे १० कोटी १६ लाख झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

देशात काल १ लाख ५२ हजार ८८९ नवे कोरोनाबाधित आढळले. तर ९० हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ कोटी २० लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९० पूर्णांक ४४ शतांश टक्क्यावर आला आहे.

सध्या देशभरात सुमारे ११ लाख ८ हजार अॅक्टीव रुग्ण आहेत. काल ८३९ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत या संसर्गाना १ लाख ६९ हजार २७५ रुग्ण दगावले आहेत.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image