लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ४५ वर्षांवरच्या नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ३ हजार २९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाख १० हजार ६३९ लोकांचं लसीकरण झालं. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५७ हजार त्याखालोखाल मुंबईत ५० हजार लाभार्थ्यांना लशीची मात्रा देण्यात आली.

राज्यानं आतापर्यंत सुमारे ६५ लाख ५६ हजार ४९९ लाभार्थ्यांना लशीची मात्रा देण्यात आली आहे. यात  २ लाख ७४ हजार ४९९ लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड, तर ३६ हजार ६१०लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीन लशीची मात्रा दिली गेली. लसीकरणात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. 

देशभरात पहिला क्रमांक कायम राखला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीलं आहे.