मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत लॉकडाऊनच्या आजच्या दुसरा दिवशी दुकानदार, छोटे मोठे व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.

दादर, भायखळा, लालबाग, काळाचौकी, फोर्ट, चेंबूर, मुलुंड, कुर्ला, गोवंडी आदी परिसरात काही दुकानदारांनी दुकानं उघडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी दुकानं बंद करायला लावली. काही ठिकाणी भाजीपाल्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकांवर ओळ्खपत्राची तपासणी करून प्रवासाची मुभा दिली जात आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये नेहमी इतकी गर्दी नाही. बसस्थानकांत गर्दीवर नियंत्रण आल्याचं दिसत आहे.

दुपारनंतर पोलिसांनी विविध भागात गस्तीला सुरुवात केली आहे. काल संचारबंदीच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी कारवाई केली नाही, मात्र आजपासून कडक अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.