९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना राज्य सरकारतर्फे अर्थसहाय्य

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत ९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना राज्य सरकारतर्फे अर्थसहाय्य केलं आहे, अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अवघ्या ४ दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात  बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात १३ लाख नोंदीत बांधकाम कामगार आहेत. या बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचं अर्थसहाय्य राज्या सरकारनं अलिकडेच जाहीर केलं होतं आतापर्यंत २ लाख ३ हजार कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं.