कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना १४ दिवस गृह विलगीकरण ठेवावं- त्रंबकेश्वर नगरपालिका
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : हरिद्वार इथं कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना चौदा दिवस गृह विलगीकरण ठेवावं यासाठी त्रंबकेश्वर नगरपालिकेनं दहा आखड्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
त्रंबकेश्वर इथं दहा शैव आखाडे आणि अनेक आश्रम असून त्यातले अनेक साधू-महंत हरिद्वारला कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्यांची यादी त्रंबकेश्वर नगरपालिकेनं मागवली आहे. परतलेल्या साधूंनी आधी कोविड चाचणी करावी, आणि नंतर गृह विलगिकरणात राहावं, असं न करता ते रस्त्यावर फिरताना आढळले तर कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेनं दिला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.