टाळेबंदीनंतर राज्य सरकार नागरिकांना कशी मदत करणार ते राज्यसरकारनं स्पष्ट करावं- देवेंद्र फडनवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं टाळेबंदी केलीच तर त्या काळात नागरिकांना कशा पद्धतीनं मदत केली जाईल, तेही स्पष्ट करावं. अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली. ते काल  नागपूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते. विविध देशांनी टाळेबंदी केली तेव्हा देशवासियांना आर्थिक मदत देऊ केली.

केंद्र सरकारनंही नागरिकांना २० लाख कोटींचं पॅकेज दिलं होत, मात्र महाराष्ट्र सरकारनं एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. लोकांच्या मदतीसाठी आम्ही गेले वर्षभर रस्त्यावर आहोत आणि यापुढेही तेच करू, असं ते म्हणाले.