मुंबई: टीसीएल या जागतिक स्तरावरील टॉप टू टेलिव्हिजन ब्रँड आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच)साठी अधिकृत प्रायोजक असल्याचे जाहीर केले. आयपीएल २०२१ साठी पुन्हा एकदा सहयोग करत टीसीएलने देशात वेगाने वाढणाऱ्या यूझर बेससाठी उत्तम दर्जाचे मनोरंजनाचे अनुभव करणे व ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे वचन पाळले आहे. या माध्यामातून देशातील नेतृत्वाचे स्थान अधिक बळकट केले आहे.
टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन म्हणाले, “एसआरएचने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखले आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची लोकप्रियताही मोठी आहे. या टीमसोबत पुन्हा एकदा जोडले गेल्याने आम्हाला भारतातील पोहोच आणि लोकप्रियता वाढण्यास मदत होईल. खेळांना प्रोत्साहन देणे आणि ग्राहकांसाठी उत्कृष्ट क्रिकेट क्षण तयार करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला यामुळे पाठबळ मिळते.”
इंडियन प्रीमियर लीगच्या मागील सीझनसाठी टीसीएल ब्रँडने एसआरएचसोबत भागीदारी केली होती. डेव्हिड वॉर्नर, खलील अहमद आणि मनीष पांडे यांच्यासोबत व्हर्चुअल ग्रीट अँड मीटचे आयोजनही कंपनीने केले होते. यात चाहत्यांनी या स्टार खेळाडूंसोबत इंटरेस्टिंग प्रश्नोत्तरांच्या फेरीद्वारे संवाद साधला. त्यामुळे ते प्रेक्षकांशी त्यांचे नाते अधिक मजबूत झाले.
कंपनीचा उत्पादन पोर्टफोलिओ अधिक बळकट करण्यासाठी टीसीएलने नुकतेच पी७२५ हा भारतातील पहिला अँड्रॉइड ११ टीव्ही लाँच केला, यात व्हिडिओ कॉलिंगसाठी एक्सटर्नल कॅमेरा आहे. तसेच हेल्दी स्मार्ट एसी ओकॅरीना लाँच केला, ज्यात बीआयजी केअर व यूव्हीसी स्टरलायझेशन प्रो सुविधा आहे. याद्वारे ९८.६६ टक्क्यांपेक्षा जास्त बॅक्टेरिया नष्ट केले जातात.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.