राज्यांना कोविड रुग्णालयांचं नियोजन आधीपासूनच करुन त्यांची संख्या वाढविण्याची सूचना - डॉ. हर्षवर्धन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी राज्यांना कोविड रुग्णालयांचं नियोजन आधीपासूनच करुन त्यांची संख्या वाढविण्याची आग्रही सूचना केली आहे अकरा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत काल घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी विविध सूचना केल्या.

कोविड रुग्णालयांची संख्या वाढवण्यासोबतच, ऑक्सीजन सोय असलेल्या खाटा आणि अन्य सुसंगत पायाभूत सुविधा वाढवून कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येवर उपाय करावेत असंही डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.

राज्यांनी ५ ते ६ प्रमुख शहरांवर विशेष भर देताना या शहरांमध्ये किंवा आसपासच्या २ ते ३ जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांचा आराखडा तयार करावा असं त्यांनी सुचवलं. या राज्यांनी कोरोनाचा अलिकडील प्रकोप रोखण्यासाठी कोणते उपाय केले आहेत त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

यामध्ये महाराष्ट्रासोबत, छत्तीसगढ, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडु आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश होता.

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचं मूल्यमापन करण्यासाठी राज्यांनी त्यांच्याकडील माहिती यासंदर्भातील मध्यवर्ती अधिकाऱ्याकडे पाठवावी असंही हर्षवर्धन म्हणाले.

Popular posts
रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही- उच्च न्यायालय
Image
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
Image
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Image