एंजल ब्रोकिंगने ग्राहकांसाठी ‘स्मॉलकेस’ सेवा सुरु केली

 

मुंबई: उत्कृष्ट पारदर्शकता आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित केलेल्या स्टॉक बास्केटद्वारे ग्राहकांना लाँग टर्म इक्विटी पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी एंजल ब्रोकिंग लिमिटेडने आता कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर सर्वसमावेशक स्मॉलकेस सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेद्वारे एंजल ब्रोकिंग आपल्या ग्राहकांना उद्देश, संकल्पना किंवा धोरणांवर आधारीत निवडक स्टॉक किंवा ईटीएफ खरेदी करण्यास सक्षम करेल.

स्मॉलकेस हे स्टॉक किंवा ईटीएफचे असे पोर्टफोलिओ असतात, जे भारतातील टॉप सेबी नोंदणीकृत सल्लागार व रिसर्च प्रोफेशनल्सनी तयार केलेले व व्यवस्थापित केलेले असतात. स्मार्ट बेटा, थीमॅटिक अँड सेक्टरल, ऑल वेदर इन्व्हेस्टिंग यासारख्या उद्देश, संकल्पना किंवा धोरणआधारीत बाजारातील संधींनुसार ही गुंतवणूक असेल किंवा ईटीएफ आधारीत स्मॉलकेस असतील. तसेच स्मॉलकेस हे त्यांच्या जोखीमीनुसार व किमान गुंतवणूक रकमेनुसार वर्गीकृत करता येतात.

स्मॉलकेसचा ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्यात, परफॉर्मन्स ट्रॅकिंग, रिबॅलेंसिंग, एसआयपी आधारीत गुंतवणूक, पोर्टफोलिओ हेल्थ अॅनलिसिस, आणि पार्शिअल एक्झिस्ट इत्यादींचा समावेश आहे.स्मॉलकेस वापरासाठी एंजल ब्रोकिंग ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क लावणार नाही.

एंजल ब्रोकिंग लि. चे सीईओ श्री विनय अग्रवाल म्हणाले, “शक्य तेवढा तंत्रज्ञानाचा वापर करत गुंतवणुकदाराचे परतावे वाढवणे ही काळाची गरज आहे. ‘स्मॉलकेस’ सुविधेद्वारे, ग्राहकांची ही गरज अनेक प्रकारे भागवली जाईल. एंजल ब्रोकिंगचे ग्राहक आता संबंधित स्टॉक्स/ईटीएफ बास्केटमधून संबंधित बेंचमार्क निर्देशांकानुसार उत्कृष्ट कामगिरी करणारे स्टॉक्स निवडू शकतात. स्वत:चे वेगळे गुंतवणूक धोरण आणि जोखिमीची भूक यावर आधारीत ते जास्तीत जास्त पर्याय निवडू शकतात.”

एंजल ब्रोकिंग लि. चे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “एंजल ब्रोकिंगने विविध प्रकारची तंत्रज्ञान आधारीत पद्धती, साधने आणि प्लॅटफॉर्म विकसित करून गुंतवणुकदाराचा प्रवास अधिक सोपा केला आहे. या दृष्टीकोनाचा वापर करत, प्रत्येक भारतीयाला अधिक चांगली संपत्ती निर्माण करण्याचा पर्याय उपलब्ध करून देत, भारतीय रिटेल सहभाग सक्रियतेने वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. मात्र हे ध्येय गाठण्यासाठी, काही उद्देश्य आधारीत निर्णयांची गरज आहे, जेणेकरून लोकांचे या क्षेत्रात प्रवेश करण्यातील प्रमुख अडथळे दूर होतील.”