राज्यात नव्या कोरोना बाधित रुग्णांचा उच्चांक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४५ हजार ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, राज्यात आजपर्यंत एकूण ३१ लाख ६ हजार ८२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० पूर्णांक ९२ शतांश टक्के झालं आहे.

राज्यात काल ६८ हजार ६३१  नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत करोना बाधित झालेल्यांची एकूण संख्या ३८ लाख ३९ हजार ३३८  झाली आहे.

काल ५०३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६० हजार ४७३ नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत.  सध्या राज्यातला  मृत्यूदर १ पूर्णांक ५८ शतांश टक्के आहे.

राज्यात आतापर्यंत तपासलेल्या २ कोटी ३८ लाख ५४ हजार १८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ पूर्णांक १ दशांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

रायगड जिल्ह्यात काल दिवसभरात १ हजार ३७७ नवे कोरोनाबाधित आढळले. काल जिल्ह्यातल्या १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ९७० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले.

रत्नागिरी जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी ५०० हून अधिक म्हणजे ५१५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल जिल्ह्यातले १६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात २ हजार ६२ कोरोनाबाधितांवर उपचार घेत आहेत.

सांगली जिल्ह्यात काल ९६२ नवे कोरोनाबाधित आढळले, तर ३६३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. जिल्ह्यात काल १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ६ हजार ६१० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

नाशिक जिल्ह्यात काल दिवसभरात ४ हजार ९१३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर ४० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात काल ५ हजार ७४९ नव्या रुग्णांची नोंद झाली.

जालना जिल्ह्यात काल ३९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर सात बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काल ८६९ नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ७ हजार १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नांदेड जिल्ह्यात काल १ हजार ३०५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर १४ हजार ५० नवे कोरोनाबाधित आढळले. जिल्ह्यात काल २८ जण कोरोनामुळे दगावले. सध्या जिल्ह्यात १३ हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

परभणी जिल्ह्यात काल ४३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काल ७८८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सध्या जिल्ह्यात ५ हजार ९३७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी, रात्री ८ नंतर विनाकारण फिरत असलेल्यांची रस्त्यावरच ॲन्टीजन चाचणी करायची उपाययोजना राबवली जात आहे. याअंतर्गत काल २ हजार ६९७ जणांची काल ॲन्टीजन चाचणी केली गेली. यापैकी १३३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

बुलडाणा जिल्ह्यात काल ६ रुग्ण कोरोनामुळे दगावले तर ६८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल १ हजार २८५ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात ६ हजार ५७४  कोरोनाबाधीतांवर उपचार सुरू आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात काल ५४७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. जिल्ह्यात काल २५ जण कोरोनामुळे दगावले तर १ हजार ५८४ नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १० हजार ९८१ रुग्ण उपचाराधीन आहेत.

हिंगोली जिल्ह्यात कोल २१६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं. जिल्ह्यात काल १८८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, तर ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या जिल्हाभरात १ हजार २४३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातले २ हजार ३१२ रुग्ण काल कोरोनामुक्त होऊन घरी परतले. जिल्ह्यात काल ३ हजार ५९२ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात १९ हजार ९०५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.