भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन

 

पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पुणे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी पुणे शहर तहसीलदार श्रीमती तृप्ती कोलते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.