१८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी नोंदणीच्या पहिल्याच दिवशी सुमारे १ कोटी ३३ लाख नागरिकांची नोंदणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या नोंदणीला काल संध्याकाळी सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी सुमारे १ कोटी ३३ लाख नागरिकांनी नोंदणी केली. 

या नोंदणी दरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, यासंदर्भात काल माध्यमांमधे परसलेलं वृत्त आधारहीन आणि खोटं आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

कोविन पोर्टलला सध्या दर सेकंदाला सुमारे ५५ हजारजण भेट देत आहेत. त्यानंतरही पोर्टल स्थीर असून, नोंदणी प्रक्रिया सुलभ होण्याच्यादृष्टीनं पोर्टलचं सर्व्हर सक्षम असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image