कॅनडामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून साजरा होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय, बाबासाहेबांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांनुसार वाटचाल करण्याची प्रेरणा मानवतेला देईल, असं सांगत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ब्रिटीश कोलंबियाच्या नायब राज्यपालांचे आभार मानले आहे.

जगभरातले लोक आपल्या सामाजिक आणि वांशिक भेदभावाविरूद्धच्या लढाईत बाबासाहेबांच्या विचार आणि कार्यातून प्रेरणा घेत आहेत. ब्रिटीश कोलंबियाच्या प्रशासनाची आपल्या प्रदेशात सामाजिक न्यायासाठी आणि वांशिक भेदभावाविरुद्ध लढा देण्याची प्रतिबद्धता प्रशंसनीय आहे, असं.राऊत यांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.