वैद्यकीय ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत प्रधानमंत्री यांनी घेतला आढावा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठक घेतली. यासंदर्भात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांदरम्यान ताळमेळ राखावा, ऑक्सीजनची आंतरराज्य वाहतूक विना अडथळा व्हावी तसंच मेडीकल ऑक्सीजनचं उत्पादन वाढवावं, अशा सूचना प्रधानमंत्र्यांनी दिल्या.

कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या १२ राज्यांमधे ऑक्सीजन पुरवठ्याची स्थिती गंभीर असून तिथं येत्या २० तारखेपर्यंत ४ हजार ८८० मेट्रिक टन ऑक्सीजन पुरवला जाणार आहे.      

ऑक्सीजन उत्पादन क्षमतेविषयी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. २५ एप्रिलपर्यंत ५ हजार ६१९ तर ३० एप्रिलपर्यंत ६ हजार ५९३ मेट्रिक टन पुरवठ्याची तरतूद आहे, असं त्यांनी सांगितलं.

पोलाद प्रकल्पांकडचा अतिरिक्त ऑक्सीजनही स्वच्छतेची पुरेशी काळजी घेउन वापरण्यात येत आहे तसंच ऑक्सीजन सिलेंडर्स भरणारे कारखाने २४ चालवायला सरकारने परवानगी दिली आहे. गरजेनुसार ऑक्सीजनची आयात करण्याचे प्रयत्नही सुरु असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं.


Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image