कृषी, कामगार, नागरिकत्व कायद्यांबाबात अपप्रचार केला जात असून राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे, प्रधानमंत्र्यांचा टोला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, कामगार कायदे, नागरिकत्व कायदा इत्यादींबाबत अपप्रचार केला जात असून राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भाजपाच्या ४१ व्या स्थापनादिनानिमित्त बोलत होते.

लोकांच्या जमिनी हिरावून घेतल्या जातील, नागरिकत्व हिरावून घेतलं जाईल, असा प्रचार केला जातो मात्र तो पूर्णपणे खोटा आहे, असं ते म्हणाले. याबाबत लोकांमधे जाऊन जागृती करण्याचं आवाहन त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना केलं. भाजपा केवळ राष्ट्रीय हिताचंच नव्हे प्रादेशिक आकांक्षांचंही प्रतिनिधित्व करते. व्यक्ती पेक्षा पक्ष मोठा, पक्षापेक्षा देश मोठा हा भाजपाचा मंत्र आहे, असं मोदी यांनी सांगितलं. भाजपाच्या विजयावर टीका करणाऱ्या लोकांना भारताची राज्यघटना आणि लोकशाहीची परिपक्वता समजलेली नाही अशी, टीका त्यांनी केली. भाजपा हे जिकंणारं यंत्र आहे, हे खरं आहे मात्र ही चळवळ लोकांशी जोडलेली आहे, असंही मोदी म्हणाले.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image