अकोला जिल्ह्यात आठवडीबाजार सुरू होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अकोला जिल्ह्यात काल पासून सर्व प्रकारची प्रतिष्ठानं आणि दुकानं पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू राहणार आहेत. लग्नातील उपस्थितीला आता 50 व्यक्तीना तर अंत्यसंस्कारा करता  वीस व्यक्तींना हजेरी लावता येणार आहे .तसच ग्रामीण भागातील  आठवडी बाजारही दि. 5 एप्रिल पासून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचं अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं.