२५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर द्यावे - रामदास आठवले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिकेत २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून मालकी हक्काचे घर द्यावे, अशी मागणी केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई तसेच महानगर प्रदेश प्राधिकरणाकडची घरे राज्य शासनाने मुंबई मनपाच्या सफाई कामगारांना द्यावीत, असेही त्यांनी सुचवले.

महाड इथल्या चवदार तळ्याच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प अद्याप प्रलंबित असून लवकरच तिथे जल शुद्धीकरण यंत्र सुरू करण्यात येणार आहे, तसेच कल्याण मधल्या एन आर सी कामगारांची देणी देण्याबाबत न्यायालयाचा निर्णय अदानी कंपनी मान्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image