पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन

  राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी माहे जुलै ते सप्टेंबर 2020 या दरम्यान यू ट्युब चॅनलवर  “Barti Online” द्वारे एम. पी. एस. सी. पूर्व  परीक्षेचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले होते. या प्रशिक्षणादरम्यान एमपीएससी पूर्व  परिक्षेतील विषयांचे मार्गदर्शन देण्यात आले होते.

18 मार्च 2021 पासून एमपीएससी मुख्य (Mains) परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गामध्ये एमपीएससी मुख्य परिक्षेस आवश्यक उर्वरित अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन दिले जाईल. तरी इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी, पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई- बार्टी ॲपमधील M-governance अंर्तगत ऑनलाईन “एमपीएससी मुख्य (Mains) परीक्षा ऑनलाईन कोचिंगसाठी प्रवेश अर्ज”  या लिंकवर उपलब्ध आहे.

या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण 4 महिन्यांचा (जुलै 2021 पर्यंत) असेल व आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी कमी किंवा अधिक करण्यात येईल. मार्गदर्शन वर्ग सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 ते 4 या वेळेत आयोजित केले जातील. तसेच शनिवार, रविवार व शासकीय सुट्टयांच्या दिवशी बंद राहतील.  सदर ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचे फेसबुक पेज व बार्टीच्या “Barti Online” या यू ट्युब चॅनेलवरुन लाईव्ह-स्ट्रिमिंग करण्यात येत आहे, असे बार्टीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image