शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवारसाहेबांचे यापूढचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं.