राज्यातली सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ५०% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आदेश निर्गमित
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनानं राज्यातली सर्व खासगी कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आदेश निर्गमित केले आहेत. आरोग्य तसंच इतर अत्यावश्यक सेवा आणि उत्पादन क्षेत्राला यातून वगळण्यात आलं आहे.
सामाजिक अंतर राखणं सोयीस्कर होण्यासाठी, उत्पादन क्षेत्रांच्या कामाच्या पाळ्यांमध्ये वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं घेता येईल, असंही आदेशात नमूद आहे.
नाट्यगृहं तसंच सभागृहांमध्येही ५० टक्के उपस्थिती असावी, मात्र त्यांचा वापर धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे किंवा सभांसाठी करता येणार नाही, असंही या आदेशात म्हटलं आहे. या बरोबरंच कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं मिशन टेस्टिंग राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत दररोज ५० हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष्य आहे. मिशन टेस्टिंगअंतर्गत मुंबईतले मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर रोगप्रतिकारक शक्ती तपासणी चाचण्या होणार आहेत.
मॉल्स आणि चित्रपट गृहांमधे प्रवेश करण्या आधी अँटीजेन चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातून आलेल्या प्रवाशांकडे RT-PCR चाचणी केली असली तरी त्यांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात किंवा घरीच विलगीकरणात राहणं बंधनकारक करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.