देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ मध्ये पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा क्रमांक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ अर्थात जीवन सुलभता निर्देशांकांत पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा क्रमांक आला आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली.

२०२० सालात घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात देशभरातील १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या १११ मोठ्या शहरांनी भाग घेतला होता. त्यातून बंगळुरू शहर पहिल्या क्रमांकावर असून पुणे आणि अहमदाबाद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

या सर्वेक्षणामधे शहरातल्या जीवनाची गुणवत्ता नागरिकांची आर्थिक क्षमता इत्यादी १३ निकषांवर हा क्रमांक अवलंबून होता. याशिवाय नागरिकांचे शहरातल्या विविध सुविधांबद्दल असलेल्या मतांची दख्खल घेणारा सिटीजन परसेप्शन सर्वे अर्थात नागरिक आकलन सर्वेक्षण तसंच महानगरपालिकांची  कार्यक्षमता तपासणारे सर्वेक्षणही घेण्यात आले होते.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image