शर्जिल उस्मानी याने पुणे पोलिसांसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावं - मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : एल्गार परिषदेत केलेल्या प्रक्षोभक भाषणाबाबत कार्यकर्ता शर्जिल उस्मानी यानं उद्या पुणे पोलिसांसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

याप्रकरणी उस्मानीवर दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालाविरोधात त्यानं दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १६ तारखेला सुनावणी होणार आहे.

तोपर्यंत त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असेही निर्देश न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि\न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठानं दिले आहेत.

हिंदू समाज, भारतीय न्यायपालिका, संसद याविरोधात उस्मानीनं आक्षेपार्ह विधानं केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

मात्र आपल्या भाषणापूर्वी किंवा नंतर कोणताही असंतोषपसरला नाही किंवा हिंसा झाली नाही असं सांगत त्यानं हा अहवाल मागं घेण्याची  मागणी केली आहे. 

Popular posts
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image