परभणी जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ४ लाख ८० हजार २४० रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : परभणी जिल्ह्यातल्या पाथरी शहरातून  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज पहाटे सुमारे ४ लाख ८० हजार २४० रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. शहरातल्या सेलू कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात गुटका साठवून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक आणि अतिरीक्त पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं या परिसरातल्या एका गोदामात छापा टाकून  शासनानं प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे, तर पाथरी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.