सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारत मोठे यश मिळवेल, असा प्रधानमंत्र्यांना विश्वास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारताला मोठे यश मिळवेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे ३ दिवसीय मेरीटाईम इंडिया समिटचे उद्घाटन करतांना बोलत होते.

जागतिक समुदायानेही देशाच्या या विकासाचा भाग व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. भारत या क्षेत्रात आता स्वाभाविक नेतृत्वाच्या स्थितीत पोहोचला असून देशातल्या बंदरांना जोडण्याचे मोठे काम झालेले आहे, असेही ते म्हणाले. आपले सरकार देशात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत असून सागरी अर्थव्यवस्थेच्या विकासावरही भर देत असल्याचे, त्यांनी सांगितले.