राज्यपालांच्या हस्ते नारी शक्ती व राष्ट्रीय सेवा सन्मान प्रदान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : करोनाचा प्रकोप अद्याप संपला नसल्यामुळे बेफिकीर न रहाता निर्भीडपणे आपापलं कार्य करावं आणि करोनाबाबत जागरुकता कायम ठेवावी असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून गोरक्षक सेवा ट्रस्ट या संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त काल राज्यपालांच्या हस्ते नारी शक्ती सन्मान, राष्ट्रीय सेवा सन्मान तसंच करोना योद्धया सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अभिनेत्री आयेशा जुल्का, रोशनी सिंह, चांद सुलताना यांच्यासह विविध क्षेत्रातल्या ११ महिलांना उल्लेखनीय कार्याबद्दल नारी शक्ती सन्मान देण्यात आले. खासदार राहुल शेवाळे यांना यावेळी राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देण्यात आला.

राज्यपालांनी काल ‘रामकथामाला’ या दिपाली पटवाडकर लिखित पुस्तकांचं प्रकाशनही राजभवनात केलं. या पुस्तकात रामायणासंर्दभात विविध देश आणि संस्कृतीमधल्या साहित्य कला यासंबंधी माहिती संकलित केली आहे.

 

 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image