प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. ढाक्याच्या विमानतळावर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. त्यानंतर मोदी यांनी तिथल्या राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देऊन बांग्लादेश मुक्ती संग्रामातील शहीदांना आदरांजली वाहिली.

प्रधानमंत्री मोदी आज बांग्लादेशातील अल्पसंख्याक समुदायाच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत. तसंच बांग्लादेशच्या राष्ट्रीय दिवस समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.