दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधायचा विचार पश्चिम रेल्वे करत आहे.

वसई रोड यार्डाजवळ याकरता दोन फलाट बांधले जाणार आहेत. यासाठी लागणाऱ्या जमीनीची निश्चिती केली असून सर्वेक्षण पूर्ण झालं आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या फलाटांमुळे वांद्रे आणि मुंबई सेट्रंल इथली गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.