संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं लोकसभेचं कामकाज संस्थगित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं लोकसभेचं कामकाज आज संपलं. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचं कामकाज ८ मार्चला सुरु झालं आणि ते ८ एप्रिलला संपणार होतं. या अधिवेशनात लोकसभेत एकूण १८ विधेयकं मंजूर झाली. त्यात खाण आणि खनिज, अनुसूचित जाती घटनाआदेश, दुरुस्तीविधेयक, विमाविधेयक, पायाभूत सुविधा आणि विकास, वित्तीय सेवेसाठी राष्ट्रीय बँक विधेयक, वित्त विधेयक इत्यादी विधेयाकांच समावेश असल्याचं पीठासीन अधिकारी भर्तूहरी मेहताब यांनी सांगितलं.

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाची उत्पादकता ११४ टक्के राहिली, अशी माहिती त्यांनी दिली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे ते लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा सर्व सभासदांच्या वतीनं त्यांनी व्यक्त केली आणि सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं.