आरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचा अनोखा उपक्रम

पिंपरी : रिक्षा चालवून प्रवाशांना सेवा सुविधा देणे हे खूप कष्टाचे आणि जोखमीचे काम आहे. आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महिला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने हे खडतर काम करीत आहेत. याचा आपल्याला अभिमान आहे. अशा होतकरू आणि कष्टाळू स्वाभिमानी महिलांचा समाजातील विविध स्तरातून सन्मान झाला पाहिजे व त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले.

महिलादिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील महिला रिक्षाचालकांना आरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख यांच्यावतीने निवडक महिलांना साडी, चप्पल आणि प्रथमोपचार किट देऊन सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या हस्ते महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. रिक्षाचालक कविता मैंदाळ यांनी रिक्षा चालवून आपल्या मुलाला डॉक्टर व मुलीला अभियंता असे उच्च शिक्षण दिले, याबद्दल मैंदाळ आणि पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या महिला रिक्षाचालक सविता आव्हाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

आरपीआय (आठवले) राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमा आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (8 मार्च) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुमताज शेख, माजी स्वीकृत प्रभाग सदस्य हमीद शेख, आरपीआय वाहतूक आघाडी शहराध्यक्ष राम बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल अगरवाल, बशीर सय्यद, मेघा आठवले, गंगाताई धेंडे, मनीषा प्रधान, ललिता बनसोडे, फिरोज पाटील, असिफ शेख, शाम उनवणे, प्रवीण चौधरी, जॉर्ज फ्रान्सीस, युवराज भास्कर, अमोल ढमाळे, सचिन गायकवाड, सुनील शिंदे, इब्राहिम शेख, आनंद देवकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रातराणी महिला रिक्षा स्टॅण्डच्या रिक्षा चालक सविता आव्हाड, जयश्री शिरसाठ, स्मिता शिरसाठ, लक्ष्मी वैरागे, कविता सकट, जनाबाई वैरागे, संगीता जाधव, हिना तांबोळी, रोहिणी वाघमारे, राणी मांडगे, सविता मिसाळ, प्रज्वला आव्हाड, सुनीता डफ आदी उपस्थित होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रातराणी महिला रिक्षा स्टॅण्डचे उद्‌घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजक अजिज शेख यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक महिला कुटुंबाच्या चरितार्थासाठी रिक्षा चालक म्हणून काम करीत आहेत. यामध्ये बहुतांश महिला विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आहेत. अशा गोरगरीब कुटुंबातील महिलांना रिक्षा चालविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रिक्षातील प्रवासी तसेच टवाळखोरांकडून देखील त्यांना त्रास सहन करावा लागतो. अशावेळी पोलिस प्रशासनाबरोबरच वाहतूक आघाडीचे कार्यकर्ते मदतीला धावून येतील. वेळप्रसंगी अशा टवाळखोरांचा सामना करण्यासाठी चप्पलचा वापर करा. तसेच रस्त्यात एखादा अपघात घडल्यास रिक्षात असणा-या प्रथमोपचार पेटीचा उपयोग करून पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अजिज शेख यांनी केले.


Popular posts
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
Image
जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती
Image