राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची राज्यपालांकडे मागणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालच्या रिपब्लिकन पक्षानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिलं. त्यानंतर पक्षाचे नेते अविनाश महातेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत लोकांचा विश्वास उडाला आहे, असं या निवेदनात म्हटलं असल्याचं महातेकर यांनी सांगितलं.