एमजी इंडियाद्वारे नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर अँम्ब्युलन्स दान

 

नागपुर : एमजी सेवा उपक्रमाच्या अंतर्गत एमजी मोटर इंडियाने नागपुरच्या नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलला पाच रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स दान दिल्या. नागपुरमध्ये COVID-19 च्या केसेस पुन्हा वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत ह्या अॅम्ब्युलन्समुळे सामान्य जनतेला उत्तम अॅम्ब्युलन्स सेवा मिळू शकले. नांगिया हॉस्पिटल आणि एमजी मोटर यांनी या दुसर्‍या लाटेत पुढे येऊन लोकांसाठी अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली आहे. ही अॅम्ब्युलन्स सेवा खास करून नागपुरमध्ये राहणार्‍या COVID-19 रुग्णांनाच देण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री. नितिन गडकरी यांनी या सेवेचे उद्घाटन करून या शहरातील हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भर घातली.

या हेक्टर अॅम्ब्युलन्स एमजी च्या इंजिनियर्सनी त्याच्या हालोल येथील प्लांटमध्ये विशेष गरजा पुरवण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. पाच-निकषांच्या मॉनिटरसह औषधांचे कपाट, एक ऑटो लोडिंग स्ट्रेचर, व्हेंटिलेटर, एक ऑक्सीजन सप्लाय सिस्टम, अतिरिक्त सॉकेट्स सह एक पर्यायी पॉवर बॅकअप (इन्व्हर्टर), सायरन, एक लाइटबार आणि फायर एक्स्टिंग्विशर यांनी त्या सुसज्ज आहेत. एमजी ने यापूर्वी वडोदरा येथील GMERS हॉस्पिटल आणि हालोल येथील CHC हॉस्पिटल यांना हेक्टर अॅम्ब्युलन्स दान दिल्या आहेत.

सदर उपक्रमाबद्दल बोलताना एमजी मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “आम्हाला वडोदरा येथील GMERS हॉस्पिटल आणि हालोल येथील CHC हॉस्पिटलकडून हेक्टर अॅम्ब्युलन्सबद्दल सकारात्मक फीडबॅक मिळाला आहे. या अॅम्ब्युलन्समुळे या महामारीविरुद्धच्या लढ्यात त्यांची मूर्त मालमत्तेची क्षमता वाढली आहे. एमजी सेवा उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही समाजातील गरजा पूर्ण करण्याबाबत अत्यंत समर्पित आहोत कारण तो एमजी चा एक आधारस्तंभ आहे. आता आम्ही हालोल आणि वडोदराच्या पुढे जाऊन आणखी पाच हेक्टर अॅम्ब्युलन्स दान करत आहोत. आमचा विश्वास आहे की, काळाच्या गरजेनुसार समाजाची सेवा करण्यात हेक्टर अॅम्ब्युलन्स यापुढेही अशीच मदतरूप होत राहील.”

नागपुरमध्ये राहणारी कोणतीही व्यक्ती 8988897888 वर कॉल करून COVID-19 रुग्णासाठी या अॅम्ब्युलन्स सेवेचा लाभ घेऊ शकते.