देशभरात कोरोना लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ देण्याची पंतप्रधानांची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ तसेच प्रोत्साहन देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत, हाफकिन संस्थेला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी, अशी विनंती केली. त्यावर पंतप्रधानांनी, संपूर्ण देशभरात अशा संस्थांना पाठबळ देण्याचे जाहीर केले.

गेल्या आठवडाभरात देशातल्या ७० जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण दीडशे टक्क्यांनी वाढल्याकडे लक्ष वेधत, कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपवण्यासाठी, आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले.

कोविडविरोधातल्या लढाईत आजवर मिळालेले यश, थोड्याशा बेजबाबदारपणामुळे हातातून निसटून जायला नको, असे पंतप्रधान म्हणाले.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image