राष्ट्रपती तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून तीन दिवस उत्तर प्रदेशातल्या पूर्वांचल भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सोनभद्र आणि मिर्झापूर जिल्ह्यातल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज दुपारी ते काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार असून संध्याकाळी दशाश्वमेघ घाटावर गंगा आरतीला उपस्थित राहणार आहेत.