राज्यात काल एकाच दिवसात ४० हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड प्रार्दुभाव झपाटयानं वाढत असून, काल एकाच दिवसात ४० हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या २७ लाख १३ हजार ८७५ वर पोचली आहे. राज्यात काल १०८ रुग्णांचा मृत्यू झाला.

सध्या राज्यातला मृत्यूदर २ टक्क्यावर आला आहे. काल १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५ पूर्णांक ९५ शतांश टक्के झालं आहे.

सध्या राज्यात ३ लाख २५ हजार ९०१ सक्रीय रुग्ण असून त्याच्यांवर उपचार सुरु आहेत आजपर्यंत तपासलेल्या १ कोटी ९३ लाख ५८ हजार ३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७ लाख १३ हजार ८७५, म्हणजे १४ पूर्णांक २ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १५ लाख ५६ हजार ४७६ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत, तर १५ हजार ८५२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image