भारतीय तटरक्षक दलाची मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं काल मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई करत ३०० किलो हेरॉईन, पाच ए के ४७ रायफली आणि १ हजार जिवंत काडतुसं जप्त केली. एक विदेशी बोट अरबी समुद्रात अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करण्यासाठी येणार असल्याची माहिती तटरक्षक दलाला १५ मार्चला मिळाली होती. यानंतर ही संशयास्पद बोट शोधण्यासाठी सागरी आणि हवाई गस्त घातली जात होती. यादरम्यान श्रीलंकेच्या रवीहंसी या मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटीवर छापा घालत ३०० किलो हेरॉईन आणि रायफली जप्त करण्यात आल्या.
या अंमलपदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातली अंदाजे किंमत ३ हजार कोटी रुपये आहे. गेल्या १५ दिवसांत भारतीय तटरक्षक दलानं केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षीही तटरक्षक दलानं धडक मोहिमा राबवत ४ हजार ९ शे कोटी रुपये किमतीचे दीड टनांहून अमलीपदार्थ जप्त केले होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.