नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला मान्यता

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळानं नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महा मेट्रोच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होईल. केंद्र शासनाच्या आवास  आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा आणि महामेट्रोचे महासंचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना कामाची रुपरेषा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारनं देखील या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.