होळी आणि धुलिवंदनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य़ा राज्यातल्या जनतेला शुभेच्छा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होळी आणि धुलिवंदनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्यानं सर्वांनी आपल्या घरीच हा सण साजरा करावा आणि पर्यावरणाचं रक्षण करावं, असं आवाहन राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात केलं आहे.

परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणानं साजरे करावेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचं काटेकोर पालन करूया, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.तर, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला होळीचा सण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.