राज्याच्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यातल्या मंगरूळ, कारंजा, मालेगाव, रिसोड मानोरा आणि वाशीम तालुक्यात काल रात्री वादळी -वारा,तसंच गारा पडल्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकासह फळबागा आणि भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालं. जिल्ह्यातला वीज पुरवठा मध्यरात्री उशिरापर्यंत बंद होता.
वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी, आर्वी आणि कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे चणा, गहू पपई, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी करून ठेवलेला गहू, चणाही पावसामुळे भिजला. तालुका प्रशासनाच्या सूचनेवरून सध्या महसूल आणि कृषी विभागाकडून युद्धपातळीवर नुकसानीच्या सर्वेक्षणासह पंचनामे केली जात आहेत.
बुलढाणा जिल्हयातल्या बुलडाणा, खामगाव, चिखली, देऊळगाव राजा,शेगाव, संग्रामपूर, शेगाव सह मोताळा सिंदखेड राजा या तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये काल संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला
परभणीत सोनपेठ तालुक्यातल्या उक्कडगाव ते वडगावच्या परिसरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारांसह मुसळधार पाऊस झाला तर गंगाखेड-परळी या रस्त्यावरच्या सोनपेठ हद्दीतल्या उक्कडगाव पासून, नैकोटवाडी, करम, ते गंगाखेड पासून दहा किलोमीटर अंतरावरील वडगावपर्यंत वादळी वारे, गारांचा पाऊस पाऊस सुरू होता.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.