पुरस्कार म्हणजे समर्पण भावनेने काम करणाऱ्यांना प्रेरणा : सुशिलकुमार शिंदे

 

ग्लोबल चेंजमेकर अवॉर्डचा दिमाखदार सोहळा संपन्न

मुंबई : समाजातील उपेक्षित घटकांसाठी तसेच शिक्षण, कला, क्रिडा, आरोग्य, सांस्कृतिक, पर्यावरण, कृषी, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रात जीवनभर समर्पण भावनेने काम करणा-या व्यक्ती व संस्थाना ‘ग्लोबल चेंजमेकर अवॉर्ड 2020’ प्रेरणादायी ठरेल. अशा पुरस्कारांमुळे त्यांना आणखी उत्साहाने काम करण्याची शक्ती मिळेल असे प्रतिपादन माजी केंद्रिय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले.

सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे. समाजातील सर्व प्रकारचे भेदभाव नष्ट होऊन मानवी जीवनमान उंचवावे यासाठी विविध क्षेत्रात तळागाळापासून उल्लेखनिय काम करणा-या व्यक्ती तसेच संस्थांना पाठबळ मिळावे. या उद्देशाने मानिनी फाऊंडेशन आणि प्रोजेक्ट 100 यांच्या वतीने देण्यात येणारा ‘ग्लोबल चेंजमेकर अवॉर्ड 2020’ चा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात शनिवारी (दि. 20 फेब्रुवारी) मुंबईतील हॉटेल योगी मिडटाऊन, नवी मुंबई येथे संपन्न झाला.

माजी केंद्रिय मंत्री सुशिलकुमार शिंदे, ज्येष्ठ समाज सेवक पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. विजयकुमार शहा, डॉ. रंगनाथ नायकडे, मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. भारती चव्हाण, सुरज गायकवाड आदींसह देशविदेशातून आलेले पुरस्कारार्थी उपस्थित होते.

शिक्षण, कला, क्रिडा, आरोग्य, पर्यावरण, माध्यम, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, महिला सक्षमीकरण, लिंग समानता, मानवाधिकार आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या पंधरा देशातील आणि भारतातील विविध राज्यातील संस्था व व्यक्तींना ‘ग्लोबल चेंजमेकर पुरस्कार 2020’ देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारार्थीची निवड जगभरातील ज्येष्ठ वीस परिक्षकांनी केली.

यावर्षी देण्यात आलेले पुरस्कार मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला आणि महात्मा गांधी यांना समर्पित करण्यात आले. ग्रीसच्या रैना लांपूजी, फिलिपिन्समधील जेन्सी लेन, श्रीलंका येथील मनु नवरत्ना, फ्रान्समधील डॉ. मालिनी रंगनाथन, मध्य अमेरिकेतील नॅन्सी मारिन, डॉ. महमंद सादिक इजिप्त, भावना प्रदोमना पॅरिस, भूतान येथील डॉ. रिंचल चोपल, थॉमस पोलंडमधील स्टुत्झ, स्वित्झर्लंडमधील अण्णा दुरीश, युनायटेड किंगडमचे डॉ. करण जॉनसन, बांगलादेशमधील शर्मिन लीना यांचीही पुरस्कारसाठी निवड करण्यात आली होती.

तसेच पिंपरी चिंचवडच्या संगीता तरडे, मध्य प्रदेशातील प्रज्ञा मिलिंद जी, नेपाळमधील नमिता घिमिरे, साहिल कौशार, बिहारमधील सुजित कुमार, विशाखापट्टणमचे सुरेश काकरा, केरळमधील सामनथा भट्टाचार्य, महाराष्ट्रातील दिनेश ठाकरे, कर्नाटकचे लक्ष्मीनारायण सिंग तेलंगणा येथील ऋषी पांडे, हरियाणाचे ललित डागर, सुभाष चव्हाण, दिल्लीचे सुधीर गेहरा, महाराष्ट्रातील राजश्री गायकवाड,

पल्लवी गायकवाड, हसीना शेख, कौशार खान तसेच गोव्यातील तृप्ति दास, मणिपूर येथील तुळशी कुमारी, ओडिशा मधील जगन्नाथ महंत, अमित कुमार झारखंडचे, बाबर अफजलला लडाखचे, साहिल कौशर उत्तर प्रदेश आणि मधुकर बच्चे, चंद्रकांत पाटील, डॉ. मोहन कदम, विकास देशमुख, डॉ. नवनाथ दुधाळ महाराष्ट्रचे, निर्मल केसकर मुंबई, शामल शेठ रत्नागिरी, डॉ. हर्षा चतरथ पुणे, अरुण सेलम पुणे, डॉ. नंदा शिगुंडे सोलापूर, स्वाती शहा कोल्हापूर, माधुरी भोसले कोल्हापूर, प्रा. संजिवनी आपटे सांगली, प्रज्ञा कांबळे पुणे, वंदना नागवंशी नाशिक, मोनिका शिंपी धुळे, परमजीत कौर धुळे, अॅड. पुनम तांबट नाशिक, डॉ. अनिता पाटील जळगाव, अतुल परदेशी आणि कृष्णा ढोकले महाराष्ट्र यांनाही ‘ग्लोबल चेंजमेकर पुरस्कार 2020’ देऊन गौरविण्यात आले.

मानिनी फाऊंडेशन आणि प्रोजेक्ट 100 या संस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत प्रास्ताविक मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. भारती चव्हाण, सुत्रसंचालन प्रा. रेवती मुरली यांनी केले.