भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील मर्यादित षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात काल लखनौ इथं झालेल्या पाच मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना भारतानं ९ गडी राखून जिंकला असून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

आफ्रिकेनं दिलेलं १ शे ५७ धावांच आव्हान भारताने २८ षटक आणि चार चेंडूत पार केलं. स्मृती मानधना हिने ८० तर पूनम राउत हिने ६२ धावा केल्या. गोलंदाजीत झुलन गोस्वामीनं ४ तर राजेश्वरी गायकवाड हिने ३ गडी बाद केले.