प्रधानमंत्री येत्या २८ मार्चला आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २८ मार्चला सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील.

हा या कार्यक्रमाचा ७५ वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी जनतेनं नमो अॅप तसंच माय गव्ह ओपन फोरमवर किंवा १८००११७८०० या टोल फ्री क्रमांकावर आपल्या सूचना आणि म्हणणं रेकॉर्ड करून पाठवावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे.

याशिवाय १९२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल केल्यानंतर एसएमएसद्वारे आलेल्या दुव्यावर जाऊनही आपल्या सूचना देता येणार आहेत.