इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा १ डाव २५ धावांनी विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतानं तिसऱ्याच दिवशी इंग्लंड संघावर एक डाव आणि २५ धावांनी दणदणीत विजय नोंदवला.

अहमदाबादमधल्या या सामन्यासोबतच चार सामन्यांची कसोटी मालिकाही भारतानं ३-१ अशी जिंकली. भारतानं या सामन्यात इंग्लंड संघाला पहिल्या डावात २०५ धावांवर बाद केलं होतं.

काल भारतानं पहिल्या डावात १६० धावांची आघाडी मिळवल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव केवळ १३५ धावांवर संपुष्टात आला.

रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा भेदक मारा करत प्रत्येकी पाच गडी बाद केले. शतकवीर ऋषभ पंत सामनावीर तर अश्र्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

या मालिका विजयामुळे भारतीय कसोटी संघ, जागतिक कसोटी विजेतेपदासाठी अंतिम फेरीतल्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीस पात्र ठरला आहे.

भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा सामना १८ जूनपासून लंडनच्या लॉर्डस मैदानावर खेळवला जाणार आहे.