राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात;३५ हजार ७२६ नव्या रुग्णांची नोंद

 https://ekachdhyeya.com/wp-content/uploads/2020/12/NPIC-20201214103325.jpg

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.  राज्यात आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८६ पूर्णांक ५८ शतांश टक्के झालं आहे. काल ३५ हजार ७२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २६ लाख ७३ हजार ४६१ झाली आहे. सध्या राज्यभरात तीन लाख तीन हजार ४७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल १६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार ७३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे.