राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात सध्या उष्णतेची लाट आहे. यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा आठ अंशांनी दिल्लीतलं तापमान अधिक असून काल ४० पूर्णांक १ शतांश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.

तापमान ४० अंशांच्या वर गेल्यास उष्णतेची लाट असल्याचं जाहीर केलं जातं. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पारा ४० अंशांवर गेला असून विदर्भात ब्रह्मपुरी इथं काल ४३ पुर्णांक ३ दशांश अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली.